Maharashtra Assembly President Election : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशाच्या आधी विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा रंगली आहे. यापैकी पुण्याचे आमदार संग्राम थोपटे आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे आघाडीवर आहेत. Maharashtra Assembly President Election, Congress MLA Sangram Dhopte Or Amin Patel
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशाच्या आधी विधानसभा अध्यक्षपदाची चर्चा जोरात सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी जोरदार स्पर्धा रंगली आहे. यापैकी पुण्याचे आमदार संग्राम थोपटे आणि मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे आघाडीवर आहेत.
दरम्यान, काँग्रेस हायकमांडकडून कोणाच्या नावाला पसंती मिळते याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलैदरम्यान होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी महाविकास आघाडीतील नेते चर्चा करणार असल्याचे आधी सांगण्यात येत होते. परंतु, विधिमंडळ अधिवेशन केवळ दोन दिवसांचे आहे. त्यामुळे अध्यक्षपद निवडीबाबत इतक्या तत्काळ निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत सोनिया गांधींनी अनुकूलता दर्शवली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी याबाबत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते की, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार आहे. त्यात दुमत नाही. अध्यक्षपदाची निवड येत्या पावसाळी अधिवेशनात होईल. दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील भेटीवरही थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशी भेट होणे यात काही विशेष बाब नाही. शरद पवार हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होत असेल तर ते चांगलेच आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, असेही ते म्हणाले.
Maharashtra Assembly President Election, Congress MLA Sangram Dhopte Or Amin Patel
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App