विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर: कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली. काँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आणि काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
Mahadik vs Patil in kolhapur vidhan parishad election, Satej patil files nomination for vidhan parishad in kolhapur
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या मतदार संघातून सतेज पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल होण्यास सुरवात झालेली असूनपण एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. सतेज पाटील यांनी पहिला अर्ज भरला.
विधान परिषद निवडणूक ; कोल्हापुरात सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेनेचे शिक्षण मंत्री उदय सामंत, काँग्रेस आमदार पी. एन. पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांच्याबरोबर उपस्थित होते. धैर्यशील हॉलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सतेज पाटील यांच्या विजयाचा निश्चय करण्यात आला. यावेळी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App