वृत्तसंस्था
पुणे : पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचे आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु,या ठिकाणी बंदी असल्याने अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. परंतु, अनेक पर्यटक बंदी झुगारून थेट धरणापर्यंत पोचत आहेत. Lonavla Bushi Dam Overflows Due To Heavy Rainfall
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार पावसामुळे धरण खूपच अगोदर भरले आहे. त्यामुळे धरणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. आठवडाभरापासून लोणावळा परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत. याचमुळे परिसरनयनरम्य झाला असून डोंगर दऱ्यानी हिरवा शालू परिधान केला आहे.
सहयाद्रीच्या कुशीतील डोंगरकड्यांमधून छोटे मोठे धबधबे कोसळत आहेत.कोरोना संकटामुळे भटकंतीस नागरिकांना परवानगी नाही. गेल्या रविवारी सहारा पुलापाशी पर्यटकांनी गर्दी केली होती. विनवणी करून त्यांना पोलिसांनी परत पाठवाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App