Lockdown In Maharashtra : निर्बंध आणि सूट एकाच वेळी शक्य नाही. कोरोना साखळी तोडल्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शक्यता शनिवारी बोलून दाखवली. हा लॉकडाऊन एकतर 8 दिवस किंवा 14 दिवसांचा असू शकतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊनबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन ते याबाबत निर्णय घेणार आहेत. lockdown in Maharashtra Could Be Declared today, CM Uddhav Thackeray meeting With task force
विशेष प्रतिनिधी
मुंबई : निर्बंध आणि सूट एकाच वेळी शक्य नाही. कोरोना साखळी तोडल्यासाठी लॉकडाऊनला पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची शक्यता शनिवारी बोलून दाखवली. हा लॉकडाऊन एकतर 8 दिवस किंवा 14 दिवसांचा असू शकतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत लॉकडाऊनबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. टास्क फोर्ससोबत बैठक घेऊन ते याबाबत निर्णय घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांची मते घेण्यात आली. तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. संध्याकाळी पाच वाजेपासून अडीच तास चाललेल्या या बैठकीत अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला. या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत प्रत्येकाच्या मतावर विचार करतील आणि महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन घालायचे की नाही, याबाबत निर्णय घेतील.
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2021
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2021
रविवारी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, जनतेला थोडासा कडवा डोस देणे आवश्यक आहे. तुम्हाला कोरोनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पुढील काही दिवस महाराष्ट्रात कडक लॉकडाउन लावणे आवश्यक आहे, त्यानंतर एक गोष्ट हळूहळू खुली केली पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाउनचा पर्याय आवश्यक आहे, कारण आरोग्य सुविधांवर खूप दबाव आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउन हा एकच उपाय आहे, जगाची उदाहरणे पाहून घ्या. मुख्यमंत्री 8 दिवसांच्या लॉकडाउनबद्दल बोलत होते, तर तज्ज्ञांचे मत 14 दिवसांच्या लॉकडाउनला अनुकूल होते.
आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता सर्व खुले झाले आहे त्यामुळे यात व्यावहारिक अडचणी येतात हे केंद्राने समजून घ्यावे — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 10, 2021
आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते.
आता सर्व खुले झाले आहे त्यामुळे यात व्यावहारिक अडचणी येतात हे केंद्राने समजून घ्यावे
मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन स्ट्रेन पाहता ही लसदेखील सुरक्षित नाही. लसचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना होतो. याशिवाय रेमेडासिव्हिर इंजेक्शनची कमतरता, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याचेही यावेळी चर्चेत आले. राज्यात बरीच रुग्णालये पूर्ण भरलेली आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाउन हा एकच पर्याय आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक 5 वाजता सुरू झाली, जी दोन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लॉकडाऊन गरिबांचे कंबरडे मोडेल. जर लॉकडाउन लादायचे असेल तर गरिबांना आर्थिक मदत दिली जावी.
Sharing link of my views in today’s all party meeting called by CM Uddhav Thackeray ji. Various Ministers, officials, @BJP4Maharashtra President @ChDadaPatil , LoP @mipravindarekar attended the meeting too. https://t.co/RfjCK8FbJB #MaharashtraFightsCorona — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 10, 2021
Sharing link of my views in today’s all party meeting called by CM Uddhav Thackeray ji. Various Ministers, officials, @BJP4Maharashtra President @ChDadaPatil , LoP @mipravindarekar attended the meeting too. https://t.co/RfjCK8FbJB #MaharashtraFightsCorona
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 10, 2021
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जे लोक रोजंदारीवर मजुरी करतात आणि ज्यांना रोजच्या गरजा भागविण्यासाठी रोज काम करण्याची आवश्यकता आहे, जे लोक लहान व्यापारी आहेत अशा आर्थिक दुर्बल लोकांना आर्थिक मदत कशी द्यावी, यावर ते सोमवारपर्यंत संपूर्ण तपशीलवार योजना तयार करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुकारलेल्या सर्वपक्षीय बैठकीत कॉंग्रेस नेत्यांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मध्यम भूमिका घेण्याविषयी बोलत होते. म्हणजेच संपूर्ण लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लादले पाहिजेत आणि आर्थिक व्यवहारही सुरू ठेवले पाहिजेत. परंतु कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांची भूमिका अशी होती की, जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. मुख्यमंत्र्यांना आम्ही सहकार्य करू. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचे सहकार्य असेल.
lockdown in Maharashtra Could Be Declared today, CM Uddhav Thackeray meeting With task force
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App