पुनावाला म्हणाले की ,नोवोवॅक्स ही लस 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना देऊ शकतो. त्याची ट्रायल सुरू आहे. त्याची ट्रायल संपली की आम्ही ती देऊ शकतो. अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही. Let the kids learn online for two more years, if you want, ask Pawar, why did Cyrus Punawala say that?
विशेष प्रतिनिधी
पुणे : काही देश हळूहळू सर्व काही शिथिल करत आहेत.दरम्यान शाळा सुरू करत आहेत. त्याचा परिणाम बघून आपण पुढे जायला हवं, असं सीरम इन्स्टिट्युटचे संस्थापक सायरस पुनावाला म्हणालेत.
डॉ. सायरस पुनावाला यांना मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला असून, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्यावेळी सायरस पुनावाला बोलत होते.
विविध देशात शाळा सुरू करत आहेत.त्याचा काय परिणाम आहे. ते पाहून आपण पुढे गेलं पाहिजे. एक दोन वर्षे शाळा नाही सुरू झाल्या तरी आपण घरीच अभ्यास करू शकतो. मी कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेब मला हसायचे. हा कँटीनमध्येच भेटेल हे त्यांना माहीत असायचं. मी वर्गात जात नव्हतो. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली. हवं तर शरद पवारांना विचारा, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
पुढे पुनावाला म्हणाले की ,नोवोवॅक्स ही लस 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना देऊ शकतो. त्याची ट्रायल सुरू आहे. त्याची ट्रायल संपली की आम्ही ती देऊ शकतो. अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही.
तसेच कोव्हिशिल्डची टेस्टिंग केली, तेव्हा 18 वर्षांखालील मुलांना द्यायला परवानगी मिळालेली नाही आणि आम्ही परवानगी घेणारही नाही. कारण ते धोकादायक आहे. कोणावर काही रिॲक्शन झालं आणि कोण मेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, मी तर घेणार नाही, असंही सायरस पुनावालांनी सांगितलंय.
अमेरिकेत आताही अनेक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोना हा जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.
कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे, तर निष्काळजीपणामुळेच मृत्यूचे प्रमाण जास्त आहे असा गंभीर आरोपही सायरस पुनावाला यांनी केलाय. तसंच दोन लसी एकत्र करण्यास आपला विरोध आहे. 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होत आहे. तिसरा डोस किंवा बुस्टर डोस घेतला पाहिजे. तिसरी लाट जास्त गंभीर नसेल, असंही सायरस पुनावाला यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App