पोटगी थकविणाऱ्या नवऱ्याचा टेम्पो जप्त


तब्बल दोन वर्षाच्या कालावधीत पत्नीला पोटगी न देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी पतीचा टेम्पो जप्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे – तब्बल दोन वर्षाच्या कालावधीत पत्नीला पोटगी न देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी पतीचा टेम्पो जप्त केला आहे. पतीने पत्नीला पोटगीची थकीत रक्कम दिली नाही, तर टेम्पोची विक्री करून पोटगीची रक्कम वसूल केली जाणार आहे. Last two years husband not give Alimony to wife, family court seized the husband tempo

संबंधित पती जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून, पाच वर्षांपासून पत्नीला सांभाळत नव्हता. त्यामुळे पत्नीने पोटगी मिळण्यासाठी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज मान्य करत पत्नीला दर महिन्याला 9 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश पतीला दिले.मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही पती पोटगीची रक्कम देत नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे एक लाख 98 हजार रुपये पोरगी थकीत होती. त्यामुळे पत्नीने ऍड. सुरेंद्र आपुणे आणि ऍड. विजयकुमार बिराजदार यांच्या मार्फत न्यायालयाकडे दाद मागितली. त्याची दखल घेत न्यायालयाने पतीच्या उत्पन्नाचे साधन असलेला टेम्पो जप्त करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार जळगाव पोलिसांनी नवऱ्याचा टेम्पो जप्त केला आहे, अशी माहिती ऍड. सुरेंद्र आपुणे यांनी दिली. पतीने पोटगी न दिल्यास त्याच्या पगारातून किंवा जंगम मालमत्तेच्या जप्तीतून ती वसूल करण्याचे अधिकार न्यायालयास आहेत. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिल्याचे ऍड. आपुणे यांनी सांगितले.

Last two years husband not give Alimony to wife, family court seized the husband tempo

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण