बालविवाह करत मुलीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


दाेन वर्षापूर्वी १५ वर्षाच्या मुलीस पळवून नेत तिच्यासाेबत बालविवाह करुन ती पतीसाेबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुध्दा तिच्याशी शारिरिक संबंध केल्याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे -दाेन वर्षापूर्वी १५ वर्षाच्या मुलीस पळवून नेत तिच्यासाेबत बालविवाह करुन ती पतीसाेबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुध्दा तिच्याशी शारिरिक संबंध केल्याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित मुलीच्या ३६ वर्षीय आईने पाेलीसांकडे तक्रार दिली आहे. Child marriage and posco case registered in hadapsar police station against five persons

त्यानुसार पाेलीसांनी दिनेश रघुनाथ शिंदे (वय-२५), त्याचे वडील रघुनाथ मारुती शिंदे यांना अटक केली आहे. त्यांच्यासह सासू कविता रघुनाथ शिंदे, दीर ऋषिकेश रघुनाथ शिंदे व कमलेश रघुनाथ शिंदे (सर्व रा.वैदवाडी,हडपसर,पुणे) यांच्यावर पाेक्साे आणि बाल विवाहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये संबंधित १५ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असताना, तिचे दिनेश शिंदे याच्याशी प्रेमसंबंध जुळाले. त्याने ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत तिला प्रेमाचे जाळयात ओढून तिला राहत्या घरातून ऑक्टोबर २०२० मध्ये पळवून नेत आळंदी येथे त्याचे वडील रघुनाथ शिंदे, आई कविता शिंदे , भाऊ ऋषिकेश शिंदे व कमलेश शिंदे यांच्या उपस्थितीत लग्न केले. हे माहिती झाल्यावर मुलीच्या आईने यासंर्दभात तिच्या सासरच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करते असे मुलीस सांगितले असता, मुलीने मी आत्महत्या करेल अशी बाेलल्याने आईने याबाबत तक्रार दिली नव्हती.

परंतु मुलगी नांदयला गेल्यानंतर तिला पतीने मारहाण करुन ती अल्पवयीन आहे माहिती असताना तिचे साेबत शरीर संबंध ठेवले.पुणे मनपाच कचरा उचलण्याचे कंत्राटदारीवर काम करणाऱ्या दिनेश शिंदे याचे बाहेर अन्य मुलीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करत पिडित मुलीने त्यासंर्दभात तक्रार दिली अाहे. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक सागर पाेमण पुढील तपास करत आहे.

Child marriage and posco case registered in hadapsar police station against five persons

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”