विशेष प्रतिनिधी
नाशिक : गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव हे रूढी, परंपरा याला फाटा देत सुरू केल्याने जून महिन्यापासून कांदा लिलावाच्या उलाढालीत २५० कोटींची वाढ झाली आहे. Lasalgaon committee gets turnover of Rs 250 crore in onion auction in eight months
लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यापारी वर्गाशी समन्वय साधत, अमावास्या व शनिवारी कांदा लिलाव सुरू केले असल्याने बाजार समितीत १२ लाख क्विंटल कांदा आवक वाढली आहे.
बाजार समितीच्या ७५ वर्षांच्या कालखंडात अमावास्येला कांदा, भुसार व तेलबिया या मालांचे लिलाव बंद असायचे. परंतु, शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व परिसरातील शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून अमावस्याच्या दिवशी बंद असलेले कांदा लिलाव हे सुरू झाल्याने बाजार समितीत गेल्या आठ महिन्यांमध्ये २५० कोटींची उलाढाल झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App