कोंढवा बुद्रूक परिसरातील पारगेनगरमध्ये असलेल्या फर्निचर गोदामाला मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती.Kondhva area majour fire incident in furniture godown
विशेष प्रतिनिधी
पुणे– कोंढवा बुद्रूक परिसरातील पारगेनगरमध्ये असलेल्या फर्निचर गोदामाला मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत गोदाम पुर्णतः भक्यस्थानी पडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेउन तब्बल अडीच तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.
अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पारगेनगरमध्ये फर्निचरचे मोठे गोदाम होते. मंगळवारी संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास गोदामातून मोठ्या प्रमाणात धुर येत असल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यामुळे स्थानिकांनी अग्निशमक दलाच्या जवानांनी माहिती दिली. काही वेळातच अग्निशमक दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली.
फर्निचरचे गोदाम मोठे असल्यामुळे आतील बाजूस आग वाढत होती. त्यामुळे आग विझविताना पाण्याचा मारा करताना जवानांना कसरत करावी लागत होती. अखेर दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास पथकाला यश आले. त्यानंतर परिसरात कुलिंगचे काम करण्यात येत होते. दरम्यान, गोदामाला आग कशामुळे लागली याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होउ शकले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App