उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध राज्यांच्या विधानसभांच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. 12 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे.Kolhapur North Byelection
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे यशवंत जाधव विजयी झाले होते. परंतु मध्यंतरी त्यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सूचना केली होती. परंतु, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ती फेटाळून लावली आहे. भाजप मोठ्या ईर्षेने ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीत जसा भाजपने बदल घडवला तसा बदल घडवण्याची महत्वाकांक्षा भाजप नेत्यांची दिसून येत आहे. पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट अशी की यशवंत जाधव यांनी शिवसेनेचे त्या वेळचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत राजेश क्षीरसागर देखील शिवसेनेकडून पुन्हा उतरण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना राजेश क्षीरसागर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार जयश्री यशवंत जाधव यांना पाठिंबा देतील का…?? की त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार म्हणून किंवा अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरतात…??, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. किंबहुना राजेश क्षीरसागर यांची निवडणूक लढवली तरी आणि निवडणूक नाही लढवली तरी भूमिका “अत्यंत महत्त्वाची” राहणार आहे…!!
कारण या मतदार संघाचे राजेश क्षीरसागर यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आपला एकदाच झालेला पराभव राजेश क्षीरसागर यांच्या जिव्हारी लागला आहे. अशा स्थितीत राजेश क्षीरसागर पोटनिवडणुकीत आलेली संधी कोणत्या प्रकारे घेतात याकडे राज्य राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ही झाले राजेश क्षीरसागर यांचे…!!
– भाजपचा अपबीट मूड
दुसरीकडे भाजप पाचपैकी चार राज्ये जिंकून अपबीट मूडमध्ये आहे. महाविकास आघाडी आपले घटक पक्ष कितीही बडबोलेपणा करत असले तरी केंद्रीय तपास संस्थांच्या वरवंट्याखाली दबलेले आहेत. शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कितपत मनापासून पाठिंबा देतात हेही पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेसची विधानसभेतले संख्या घटली तर ते राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना हवेच आहे.
– पंढरपूर मध्ये एकत्र येऊनही पराभव
महाविकास आघाडीने एकत्र येऊन पंढरपूर मंगळवेढा मध्ये कै. भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. परंतु भाजपच्या समाधान आवताडे यांनी त्यांचा भारत नानांच्या सहानुभूतीच्या लाटेत देखील पराभव करून दाखवला होता. आता देखील भाजप पंढरपूरच्या पोटनिवडणूकीपेक्षा अधिक अपबीट मूडमध्ये आहे. पाच राज्यांपैकी चार राज्य भाजपने जिंकली आहेतच. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जोरदार फॉर्ममध्ये आहेत. अशा स्थितीत भाजप इथे तगडा उमेदवार देऊन महाविकास आघाडीवर परत मात करणार का…?? आणि भाजपचा उमेदवार राजेश क्षीरसागर हे आतून किंवा बाहेरून पाठिंबा देणार का…?? यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.
– हसन मुश्रीफ यांची सूचना वाऱ्यावर
यामुळेच हसन मुश्रीफ यांनी सावध पवित्रा घेत कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी सूचना केली होती पण आता त्या सूचनेला शिवसेना आणि भाजप कितपत यांनी विरोधच केला आहे त्यामुळे कोल्हापूर उत्तर ची निवडणूक ही महा विकास आघाडीच्या सत्ता टिकवण्यासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.
चंद्रकांत जाधव यांच्या श्रद्धांजली सभेत पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा विचार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी बोलून दाखवली होता. तथापि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष ही निवडणूक लढवणार आहे, असे जाहीर केले आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांचीही नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस पक्षाकडून देऊन चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत महा विकास आघाडीचे नेते कोणती भूमिका घेतात यावर निवडणूक प्रामुख्याने दुरंगी होणार की तिरंगी याचा निर्णय होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App