करुणा मुंडेंनी पत्रकार परिषद घेत केला नवा गौप्यस्फोट , म्हणाल्या – राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आमच्या पक्षात प्रवेश करणार


करुणा मुंडे यांनी सध्याच्या परिस्थितीत नावे सांगण्यास नकार दिला आहे.यावेळी करून मुंडे यांनी एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा असे सुचक इशारा करुणा यांनी दिला आहे.Karuna Munde held a press conference and said that the wife of two existing ministers in the state will join our party.


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना ‘शिवशक्ती सेना’ या नव्या पक्षाची घोषणा केली होती.आज करुणा मुंडे नगर दौऱ्यावर होत्या. त्यांनी आज कार्यकर्त्यांशी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला आहे.दरम्यान या पत्रकार परिषदेत करुणा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की , “राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत.त्यादेखील माझ्या पक्षात येणार आहेत.”हा गौप्यस्फोट केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना त्या मंत्र्याच्या बायकांची नावे विचारली.तेव्हा करुणा मुंडे यांनी सध्याच्या परिस्थितीत नावे सांगण्यास नकार दिला आहे.यावेळी करून मुंडे यांनी एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा असे सुचक इशारा करुणा यांनी दिला आहे.

करुणा मुंडे यांनी अहमदनगरमध्ये 30 जानेवारी 2022 ला कार्यकर्ता मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करणार असल्याचे सांगितले होते.परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने पक्षाची स्थापना लांबणीवर पडली आहे.म्हणून कोरोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा करणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या.

Karuna Munde held a press conference and said that the wife of two existing ministers in the state will join our party.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती