निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवाय, पण महाराष्ट्रातून कोण खतपाणी घालतय?; राज ठाकरेंचा खोचक सवाल


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी कोणाचे तरी प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांसाठी कर्नाटकला सीमावाद हवा आहे. पण त्या वादाला महाराष्ट्रातून कोण ह्याला खतपाणी घालत आहे?, असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रातून खतपाणी घालणाऱ्यांना सरकारने पाहून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. Karnataka needs borderism for elections

कर्नाटकच्या निवडणुकांसाठी मुद्दा उकरला

सीमावादाचा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळले जातेय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणे असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचे आपल्याला जे हवंय तेच आपण करायचे.

केंद्र सरकारनेही यात वेळीच लक्ष घालावे

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं, असेही राज ठाकरे म्हणाले.


Raj Thackeray : महाराष्ट्रात २५० हून अधिक मनसैनिक ताब्यात; पोलिसांची अधिकृत माहिती


तर मराठी जनता तयार

कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ललकारलं आहे. सरतेशेवटी संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Karnataka needs borderism for elections

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण