WATCH : कानिकदित्य मंदिराचे पर्यटकांना आकर्षण कशेळी देवघळी बीच निसर्गसौंदर्याचा नजारा


विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी : रत्नागिरी पासून सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरावर राजापूर तालुक्यातील कशेळी हे गाव आहे. या गावांमध्ये कानिकदित्य हे सूर्य मंदिर आहे. या मंदिरात असणाऱ्या आदित्यच्या मूर्तीला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.Kanikaditya templeTourist attraction

अशी दंतकथा सांगितली जाते भारतात फक्त दोनच पुरातन सूर्य मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव सूर्य मंदिर आहे. कोणार्क मध्ये दुसरे मंदिर आहे.बाकीच्या मंदिरांमध्ये नवीन सूर्यमुर्ती आहेत. असे येथील ग्रामस्थ सांगतात.



महाराष्ट्रातील एकमेव पुरातन मूर्ती असल्यामुळे या सूर्यमंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिरापासून साधारण तीन किलोमीटरच्या अंतरावर समुद्रकिनारा हे या किनार्‍यावर जाण्यासाठी डोंगरातून खाली उतरावे लागते या किनार्‍यावर जाण्यासाठी पाखाडी बांधण्यात आली आहे

येथे खूप पर्यटक सनसेट पाहण्यासाठी आवर्जून भेट देतात. येथील देवघळी बीच पाहण्याची मजा तर औरच आहे बीच वर गेल्यानंतर त्यातील गुहा हे पर्यटकांचे आकर्षण ठरते या ठिकाणी आलेले पर्यटकही या निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजारा पाहून भारावून जातात.

  • कानिकदित्य मंदिराचे पर्यटकांना आकर्षण
  • रत्नगिरीपासून केवळ ३६ किलोमीटर
  • कशेळी देवघळी बीच निसर्गसौंदर्याचा नजारा
  •  सनसेट पाहण्यासाठी आवर्जून भेट

Kanikaditya templeTourist attraction

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात