प्रतिनिधी
पुणे : पुण्यासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये औद्योगिक आणि इतर सेवा क्षेत्रात विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या वतीने 4 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महारोजगार मेळाव्याचे आयोजन
या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 40 हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील.
या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App