पोलीसांना घरे : जितेंद्र आव्हाडांची घोषणा पण ती वरळीसाठी!! शिवसेना नाराज आणि पोलिसही!!


प्रतिनिधी

मुंबई : पोलिसांना घरे देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली खरी, पण ही घरे मोफत नाहीत. शिवाय ती वरळी पुरती मर्यादित. त्यामुळे शिवसेना नाराज आणि पोलिसही!! अशी स्थिती झाली आहे. Jitendra Awhad’s announcement but for Worli !! Shiv Sena is angry and so are the police

एकतर वरळी हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात बीडीडी चाळी येतात. तेथे 2250 पोलिसांना प्रत्येकी 500 स्क्वेअर फुटांची घरे 50 लाख रुपयांना देण्याचा निर्णय जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला. 50 लाख रुपये भरून घरे घ्यायची. त्यामुळे पोलीस नाराज झाले आणि वरळी मतदारसंघा संदर्भात घोषणा आदित्य ठाकरे यांना वगळून केली म्हणून शिवसेना नाराज झाली.

आता अशी नाराजी होणार हे घोषणा करण्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना माहिती नव्हते का?? की शिवसेनेला डिवचण्यासाठीच त्यांनी मुद्दामून 50 लाख रुपयांच्या घरांची घोषणा केली??, अशी चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे यामध्ये निवृत्त पोलिसांना बीडीडी चाळीत घरे खाली करण्याचे आवाहन देखील केले आहे. तोटा सहन करून राज्य सरकार पोलिसांना घरे देणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

– जितेंद्र आव्हाड यांनी केलेली ट्विट अशी :

– हा निर्णय करारपत्रात नमूद करून करारपत्र त्वरीत दिली जातील. ह्या निमित्ताने सर्व काम मार्गी लागलेलं आहे. तेव्हा आता निवृत्त पोलिसांनी लवकरात लवकर आपली घरे खाली करावीत ही विनंती.

– बीडीडी चाळीच्या प्रत्येक घराचा बांधकाम खर्च हा अंदाजे 1 कोटी 5 लाख ते 1 कोटी 15 लाख इतका आहे. पण म्हाडाने येथे असलेल्या 2250 पोलीस कर्मचाऱ्यांना तोटा सहन करून 50 लाख रुपयांमध्ये घर देण्याचा निर्णय घेतला आहे.

Jitendra Awhad’s announcement but for Worli !! Shiv Sena is angry and so are the police

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!