आर्यन खानच्या मदतीला धावले जावेद अख्तर, माध्यमांवरही केली आगपाखड


विशेष प्रतिनिधी

मुंबई :शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्या मदतीला आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर उतरले आहेत. फक्त 1 लाख 30 हजारांचे ड्रग्ज सापडले म्हणून कारवाई कशी केली असा सवाल त्यांनी केला आहे. यावरून माध्यमावरही त्यांनी आगपाखड केली आहे.Javed Akhtar rushed to help Aryan Khan and also fired at the media

जावेद अख्तर यांनी म्हटले आहे की, एका पोर्टवर तुम्हाला एक बिलियन डॉलर किमतीचे कोकेन मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी 1,200 लोक होते व तिथे 1,30,000 रुपये किमतीचा चरस-गांजा सापडला. 1,30,000 रुपयांचे ड्रग्ज राष्ट्रीय बातमी झाली.



एक बिलियन डॉलर किंमत असलेल्या कोकेनबद्दलची हेडलाईन मी बघितलं नाही. त्याबद्दलची बातमी तर वर्तमानपत्राच्या पाचव्या, सहाव्या पानावर दिली जाते.कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर १६ सप्टेंबर रोजी ३,००० किलोग्रॅम ड्रग्जची सापडले होते.

इराणच्या बंदर अब्बास पोर्टवरुन २ कंटेनर भारतात पाठवण्यात आले. कागदोपत्री या कंटेनरमध्ये सेमी प्रोसेस्ड टाल्क स्टोन्स असल्याचं भासवत ही मोठी ड्रग्ज तस्करी करण्यात आली. मात्र, महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या तस्करीवर कारवाई केली होती. हाच संदर्भ जावेद अख्तर यांनी दिला आहे.

बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘जिथे कुठे अल्पसंख्याकांवर अन्याय केला जातो, त्याबद्दल मला चिंता वाटते. बांगलादेशात हे घडतंय, ही लज्जास्पद बाब आहे. शेख हसीना उदारमतवादी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याच देशात हे होत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे’, अशा शब्दात त्यांनी बांगलादेश सरकारला सुनावलं.

Javed Akhtar rushed to help Aryan Khan and also fired at the media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात