विशेष प्रतिनिधी
सिंधूदुर्ग : राज्याचा चार्ज कोणाकडे दिलाय हेच आम्हाला माहिती नाहीय्. आता कुठे लोक सांगतायत आणि असं ऐकलंय की रश्मी ठाकरेंना भविष्यात मुख्यमंत्री बनवणार आहेत. ते तरी जाहीर केला. ते तरी खरं आहे का सांगा? अशी विचारणा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.Is it true that Rashmi Thackeray will be the next Chief Minister? Nitesh Rane’s question to Uddhav Thackeray
अधिवेशन सुरु असताना चार्ज कोणाकडे दिलाय? असा सवाल करत निलेश राणे म्हणाले, कानावर ज्या बातम्या पडतायत त्या ऐकून तरी आम्ही आशेत राहू की आम्हाला मुख्यमंत्री मिळेल. आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. मुख्यमंत्री आजारी आहेत आम्ही असं ऐकलेलं आहे.
पण राज्याचं अधिवेशन सुरु आहे आणि मुख्यमंत्री दिसत नाहीत तर नेमकं राज्य कोण चालवत आहे?, मुख्यमंत्री चालवतायत की दुसरं कोणी चालवतंय?ठाकरे कुटुंबाचा स्वपक्षीय नेत्यांवरही विश्वास राहिला नसल्याची टीका करताना राणे म्हणाले, स्वपक्षाच्या एकाही नेत्यावर ठाकरे कुटुंबाचा विश्वास राहिलेला नाही.
ना. एकनाथ शिंदे, ना. सुभाष देसाई कोणावरही विश्वास राहिलेला नाही. अशा अवस्थेत अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेला न्याय कसा मिळणार हे तरी सांगावे. देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारने जो गोंधळ घालून ठेवलाय, जी रोखशाही सुरु केलीय त्याबद्दल आम्ही आजपासून अधिवेशनात परखड भूमिका घेणार आहोत.
राणे म्हणाले, सत्तेत आल्यापासून सरकारमध्ये धाडसच नाही की जनतेसमोर जावं. आम्हाला आमदार म्हणून निवडणून दिलं जातं कारण आम्ही जनतेसमोर जाऊन त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये विधीमंडळासमोर विचारले पाहिजेत.
पण अधिवेशनच आठ आठ दिवस चालणार असेल त्यात दोन दिवस नाताळाची सुट्टी, त्यात मुख्यमंत्री पण नाही तर तिथे अधिवेशन काय नुसतं एअर कंडिशनमध्ये झोपण्यासाठी सुरु ठेवलं आहे का? याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App