वीज कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच ; १० लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू


वृत्तसंस्था

मुंबई : ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता चोवीस तास राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या वीज कामगारांना आता अपघाती विमा योजनेचे कवच मिळाले आहे. कर्मचाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू केली आहे. ही योजना एक वर्षांसाठी लागू असेल. Insurance cover for power employees; Accident insurance scheme of Rs. 10 lakhs is applicable



राज्यात अपघात वाढत असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांसाठी 10 लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू केली आहे. सदर विमा योजना वर्षभरासाठी असून त्याचा 60 हजार वीज कामगारांना लाभ होणार आहे.

नैर्सिगक आपत्ती, अतिवृष्टीत खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर काम करावे लागते. त्यात अनेकदा कर्मचारी जायबंदी होतात, मृत्यू ओढवतो. त्यामुळे महावितरणने कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात वीज योजना सुरू केली.

विम्याचे कवच कसे असेल ..

  • एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कायमचे दोन्ही पाय, हात अपंग झाल्यास त्याला भरपाई म्हणून शंभर टक्के म्हणजे 10 लाख रुपयांची रक्कम मिळेल.
  • जखमींना पन्नास टक्के म्हणजे 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.
  • मार्च 2022 पर्यंत ही विमा पॉलिसी लागू असणार आहे.

Insurance cover for power employees; Accident insurance scheme of Rs. 10 lakhs is applicable

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात