प्रतिनिधी
मुंबई : उद्धवजी, तुम्ही माझ्या वजनावर बोललात. पण लक्षात ठेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. त्या मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री बनला आहात. तेव्हा वजनदार माणसाच्या नादी लागू नका. सावध राहा, असा दुहेरी टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. Instead, beware of “heavy” men !!; Double tola reminiscent of a bag of flour
होय, छाती ठोकून सांगतो मी कारसेवेला गेलो होतो. त्यावेळी माझे वजन 128 किलो होते. आज 102 किलो आहे. त्यात काय लाजायचं??, मी 1990 च्या कारसेवेला गेलो होतो लाठ्या गोळ्या खायची तयारी करून गेलो होतो. बदायूंच्या तुरुंगात होतो. बाबरी मशीद माझ्या वजनाने पडली असती म्हणता. हो, आम्ही छाती ठोकून म्हणतो, आम्ही बाबरी मशीद पाडली. पण त्या वेळेला तुम्ही कुठे होतात?? तुमच्या शेपटच्या कुठे घातल्या होत्या??,असा परखड सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. हनुमान चालीसा म्हटले म्हणून देशद्रोहाचा गुन्हा लावता आणि देश के तुकडे होंगे हजार म्हणणाऱ्या शरजीलला पळून जाऊ देता हेच तुमचे हिंदुत्व. औरंगजेबाच्या कबरीवर पुढे झुकणाऱ्या ओवैसी पुढे तुम्ही झुकता हेच तुमचे हिंदुत्व. तुमचे हिंदुत्व सोनिया चरणी अर्पण आहे, अशा कठोर शब्दात मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे हिंदी भाषेत संमेलनात उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांची सभा ही मास्टर सभा नाही, तर लाफ्टर सभा असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.ज
लाफ्टर शो शेवटपर्यंत संपला नाही
उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी झालेली सभा ही मास्टर सभा असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. पण काल सभा झाल्यानंतर लक्षात आलं की ही मास्टर नाही तर लाफ्टर सभा होती. शेवटपर्यंत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील असं आम्हाला वाटत होतं, पण हा लाफ्टर शो शेवटपर्यंत संपला नाही, अशी खोचक टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
कालची सभा कौरवांची
उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाबाबत कधीही भाष्य केलं नाही. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत 100 सभांची बाप सभा असल्याचे सांगण्यात येत होते. खरं तर त्यांचं बरोबर आहेच कारण कौरवांसोबत 100 होते आणि पांडवांसोबत पाच. त्यामुळे काल झालेली सभा ही कौरवांची होती, तर आजची सभा ही पांडवांची आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App