विशेष प्रतिनिधी
मुंबई – इन्स्टाग्रामवरील लंडनच्या मित्राने महागडी भेटवस्तू पाठवण्याच्या नावाखाली महिलेची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ३४ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार केली आहे.आरोपीने इन्स्टाग्रामवरून फॉलोची रिक्वेस्ट पाठवली होती. तो लंडनमध्ये राहत असल्याचे त्याने म्हटले होते.Insta friend cheated women
त्यांची मैत्री झाल्यानंतर तिने त्याला आपला फोन नंबर दिला व त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केले. २७ जुलैला आरोपीने यातील महिलेला इंटरनॅशनल नंबरवरून फोन करून कार्गो शिपिंगने काही भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. तिला भेटवस्तूंचे फोटो तसेच डिलिव्हरी ट्रॅक करण्यासाठी तिला लिंकही पाठवली.
२९ जुलैला महिलेला एका फोन आला. फोन करणाऱ्याने तो कस्टममधून बोलत असल्याचे सांगून तुम्हाला गिफ्ट आले आहे. त्यात भरपूर रोकड असल्याचे त्याने सांगितले. तुम्हाला ते गिफ्ट पार्सल मिळवण्यासाठी एक प्रमाणपत्र द्यावे लागेल; तसेच त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले.
तक्रारदार महिलेने गिफ्ट मिळवण्यासाठी चार लाख २९ हजार रुपये भरले; मात्र दुसऱ्या दिवशी त्या महिलेला आणखी एक दूरध्वनी आला. समोरच्या व्यक्तीने इन्कम टॅक्स अधिकारी बोलत असल्याचे सांगून गिफ्टवर करापोटी पाच लाख ६९ हजार रुपये भरायला सांगितले.
महिलेने पैसे भरण्यास नकार दिला व स्वत:ची ओळख सिद्ध करायला सांगितले. या वेळी आरोपीने फोन कॉल कट केला. त्यावरून महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App