आज मतदानाचा आणि लग्नाचाही मुहूर्त आहे. त्यामुळे कळंबमधील डॉ. चेतन वाघ यांनी बोहल्यावर चढायच्या आधी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी अमरावतीकडे रवाना झाले. संविधानाने दिलेला हक्क सर्वप्रथम आणि नंतरच लग्न असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. Inspiring Groome Voted Before Marriage Peaceful voting for six Nagar Panchayats in Yavatmal
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : आज मतदानाचा आणि लग्नाचाही मुहूर्त आहे. त्यामुळे कळंबमधील डॉ. चेतन वाघ यांनी बोहल्यावर चढायच्या आधी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि नंतरच ते लग्नासाठी अमरावतीकडे रवाना झाले. संविधानाने दिलेला हक्क सर्वप्रथम आणि नंतरच लग्न असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी मतदान आपले कर्तव्य आहेत आणि हे कर्तव्य बजावण्यासाठी उर्दू शाळा मतदान केंद्रावर नवरदेव बनलेल्या डॉ. चेतन वाघ यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकेका मताची किंमत असते. चेतन वाघ यांच्या या कृतीचे कोतुक होत आहे.
यवतमाळ सहा नगरपंचायतीमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ४७ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. राळेगाव नगरपंचायतीत १४ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात आहेत.
कळंब नगरपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६३ उमेदवार, महागाव नगरपंचायतीमध्ये १३ जागासाठी ९१. मारेगाव नगरपंचायतीमध्ये १४ जागांसाठी ९०. झरीजामणी नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी ८७ तर बाभूळगाव ग्रामपंचायतीमध्ये १३ जागांसाठी ६२ उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत.
याबरोबरच ढाणकी नगरपंचायतीत दोन जागांसाठी मतदान होत आहे.बाभूळगावात पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार दोन हजार ५४४, तर महिला मतदारांची संख्या दोन हजार ५२६ इतकी आहे. कळंब नगरपंचायतीत १४ हजार २०६ मतदार आहेत. त्यात पुरुष सात हजार ८८, महिला सात हजार ११८, राळेगावात १२ हजार ५२७ मतदार आहेत. झरीजामणी येथे दोन हजार २६८, महागावमध्ये सात हजार ५२०, तर मारेगाव नगरपंचायतीमध्ये सहा हजार ५०७ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App