धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करा, अली दारूवाला यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

पुणे: धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कोंढवा येथील संघटनांचा त्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Inquire about funding of organizations who are promoting conversion, demands Ali Daruwala

जबरदस्तीने होणारे धर्मांतर व त्याअनुषंगाने उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दिकी यांची अटक या पार्श्वभूमीवर दारूवाला बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्तीने धर्मांतर करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही,उत्तर प्रदेशातील संघटना जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या कामात आहेत. आपल्या लोकशाही देशात जबरदस्तीने धर्मांतरावर बंदी आहे. तरीही नियोजनपूर्वक धर्मांतर होताना दिसते. या मागे पैशाचा गैरवापर आहे.

महाराष्ट्र, पुणे आणि कोंढव्यातील संघटनांचा वापर केला जात असल्याचा आरोप दारुवाला यांनी यावेळी केला. या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी अली दारुवाला यांनी केली. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील, असेही दारुवाला त्यांनी सांगीतले.

Inquire about funding of organizations who are promoting conversion, demands Ali Daruwala

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण