विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंदला डाव्या आणि काँग्रेस पक्षांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात शिवसेनेने मात्र फक्त बोलका पाठिंबा जाहीर केला आहे. तेसुद्धा सध्या महाराष्ट्रात काँग्रेस बरोबर शिवसेना सत्तेवर आहे म्हणून…!! अन्यथा तो पाठिंबा दिला असता की नाही याविषयी देखील शंका आहे. India closed; Congress’s support through action and Shiv Sena’s verbal support !!
बंद आणि शिवसेना यांचे अतूट नाते आहे. शिवसेना जेव्हा बंद करते तेव्हा तो शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले असतात. अशा पद्धतीने आज तरी शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले अद्याप दिसलेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यात निदर्शनांमध्ये सहभागी झाले आहेत.
काँग्रेसने ठिकाणी आपले कार्यकर्ते यानिमित्ताने रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना प्रेरित करेल असा सध्या स्वतंत्र कार्यक्रम नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने एकत्र करायचे?, हा त्यांच्यापुढे प्रश्न होताच. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना एक संधी मिळाली आहे. त्यामुळे ही संधी साधून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
शिवसेनेला मात्र यामध्ये कोणतीही संधी दिसत नाही. कारण हा बंद राजकीय पक्ष म्हणून प्रामुख्याने डाव्या पक्षांनी पुकारला आहे. शिवसेना काँग्रेस बरोबर जरी सत्तेत असली तरी ती महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. शिवाय डाव्या पक्षांचे महाराष्ट्रातले अस्तित्व नगण्य आहे. अशा स्थितीत भारत बंद यशस्वी करून डाव्या पक्षांना बळ देण्यात शिवसेनेला काही मतलब वाटत नाही. शिवाय आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी भारत बंदला फक्त बोलका पाठिंबा जाहीर केला तरी हे चालण्यासारखे आहे, असे ठरवून शिवसेनेचे नेते मोकळे झालेले दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App