उद्घाटन डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे; बोलबाला मात्र महाराष्ट्राच्या “राजकीय लेन्सेसचाच”!!


प्रतिनिधी

मुंबई : उद्घाटन होते डॉक्टर तात्याराव लहाने माने यांच्या रघुनाथ नेत्रालय आणि त्यात बोलबाला मात्र झाला महाराष्ट्रातल्या राजकीय लेन्सेसचा… कारण या उद्घाटन कार्यक्रमात शरद पवारांपासून आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत व्हाया मुंडे बंधू-भगिनी असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मग तेथे राजकीय टोलेबाजी झाली नसती तरच नवल!! Inaugural Dr. Of Raghunath Netralaya of Tatyarao Lahane; Bolbala, however, is the “political lens” of Maharashtra !!

मुंबईत प्रभादेवी येथे डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित होते.

– लेन्स शब्दावरून टोलेबाजी 

नेत्रालयाच्या उद्घाटनाचे निमित्त साधून पंकजा मुंडे यांनी लेन्स या शब्दावरून धनंजय मुंडे यांच्यावर टोलेबाजी केली. “ज्या व्यक्तीच्या राजकीय अनुभवाच्या लेन्सेस चांगल्या आहेत असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्स सर्वांना सूट करतात आणि जे सर्वांसोबत प्रेमळ वागतात असे बाळासाहेब थोरात, एक नवीन चेहरा आणि ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे असे आदित्य ठाकरे, आमचे शेजारी विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख, मुंडे महाजनांच्या लेन्समधून स्वत:ला मोठे करत पवार साहेबांच्या लेन्समधून बघणारे धनंजय मुंडे”… अशाप्रकारची टोलेबाजी करत पंकजा मुंडे यांनी भाषणाची सुरूवात केली.

– धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर

यावर प्रत्युत्तर देत पंकजाताई कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये यावे लागत, आता आम्ही व आदित्य ठाकरे बसलो होतो आणि बोलत होतो की, कदाचित ताईंनी लेन्स बदलल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या लेन्स लावल्या तर बरे होईल असे धनंजय मुंडेंनी सांगितले. तसेच कितीही राजकीय वैर असले तरी काही व्यक्ती अशा आहेत ज्यांच्यासाठी आमचे वैर वगैरे काही नाही त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने असेही धनंजय मुंडे म्हणाले.

Inaugural Dr. Of Raghunath Netralaya of Tatyarao Lahane; Bolbala, however, is the “political lens” of Maharashtra !!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”