२३ मे ते २ जून दहा दिवसांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ४५ हजार कोटी रुपयांनी वाढ


रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्ती २३ मे ते ३ जून या दरम्यान तब्बल ४५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये दहा टक्केंनी वाढ झाल्यामुळे अंबानी यांची संपत्ती वाढली आहे.In the ten days from May 23 to June 2, Mukesh Ambani’s wealth increased by Rs 45,000 crore


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्ती २३ मे ते ३ जून या दरम्यान तब्बल ४५ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये दहा टक्केंनी वाढ झाल्यामुळे अंबानी यांची संपत्ती वाढली आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार २३ मे रोजी मुकेश अंबानी यांची संपत्ती ७७ बिलीयन डॉलर होती. २ मे रोजी त्यांची संपत्ती ८३.२ बिलीयन डॉलर झाली आहे. भारतीय शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरच्या भावात दीड टक्के वाढ झाली.



सध्या रिलायन्सचा शेअर २२०० रुपयांपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी यांचा रिलायन्स कंपनीत ४९.२ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीचा सर्वाधिक फायदा त्यांना झाला आहे.

पॉलीमरच्या किंमतीने गेल्या दशकभरातील उच्चांक गाठला आहे. २०२२ मध्येही पॉलीमरच्या किंमतीत तेजी राहणार आहे. त्यामुळे पॉलीमरचे प्रमुख उत्पादक असलेल्या रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

रिलायन्सच्या शेअरमध्य गेल्या सात महिन्यांतील सर्वाधिक वाढ झाली आहे. बुधवारी रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत दीड टक्का वाढ होऊन २२०१.३० रुपयांवर बंद झाला. २१५६ रुपयांवर शेअर उघडला होता. त्यामुळे एका दिवसात जवळपास दीड टक्के वाढ झाली आहे.

मंदी आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेने जगभरातील उद्योजकांना हैराण केले असताना ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मुकेश अंबानी मात्र अपवाद ठरले आहेत. त्यांची संपत्ती सातत्याने वाढत आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल १ लाख १९ हजार कोटींची (१७ अब्ज डॉलर) भर पडली होती. वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल ४० टक्क्यांनी वधारला.

अंबानी यांची एकूण संपत्ती चार लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. अब्जाधीश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती ८३.२ अब्ज डॉलर अर्थात ७ लाख ३९ हजार कोटी आहे.

तेल आणि वायू क्षेत्रातील दबदबा असलेल्या अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने दूरसंचार, किरकोळ व्यापाराकडे मोर्चा वळवला आहे. मागील दोन वर्षात ‘रिलायन जिओ’ने दूरसंचार सेवेत मोठी मुसंडी मारली आहे.

वर्षभरात रिलायन्सच्या शेअरमधील वृद्धी ही शेअर निदेर्शांकांच्या तुलनेत सरस ठरली आहे. गुंतवणूकदार रिलायन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

भविष्यात दूरसंचार आणि रिटेल व्यवसाय रिलायन्स समूहाला फायदेशीर ठरतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने खुद्द अंबानी यांनी बिझनेस स्ट्रॅटेजी बदलली आहे.

अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगातील अवलंबित्व कमी करून त्याऐवजी दूरसंचार आणि रिटेल तसेच ई-कॉमर्स व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिओचे देशभरात जवळपास ३५ कोटी ग्राहक आहेत.

दूरसंचार सेवेमधील बड्या कंपन्यांना तोटा झाला असताना जिओने मात्र दुसऱ्या तिमाहीत ९९० कोटींचा नफा मिळाविला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत जिओच्या नफ्यात ४५ टक्के वाढ झाली.

In the ten days from May 23 to June 2, Mukesh Ambani’s wealth increased by Rs 45,000 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात