सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ‘सीगल’च्या भराऱ्या; परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले


विशेष प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : तळकोकणात दरवर्षी अनेक परदेशी पक्षी थंडीच्या दिवसात दाखल होतात. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागरकिनारे परदेशी पाहुण्यांनी फुलले आहेत. In Sindhudurg district Seagull’s flies

सीगल नावाचे हे पक्षी अमेरिका, युरोप, लडाखमध्ये पहायला मिळतात. हजारो किलोमीटरची भरारी मारून हे पक्षी तीन महिने थंडीच्या हंगामात कोकण किनारपट्टीवर येतात. उबदार वातावरण आणि खाद्य असलेले मासे या हंगामात कोकण किनाऱ्यावर मुबलक प्रमाणात मिळत असते. त्यामुळेच हे पक्षी कोकण किनारपट्टीचा आसरा घेतात.



कोकणचे किनारे सुंदर, स्वच्छ आहेत. त्यातच सीगल पक्ष्यामुळे त्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस आणि नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात.पण यावर्षी बदलत्या हवामानामुळे हे पक्षी उशीरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर दाखल झालेले पहायला मिळतात.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीगलच्या समुद्रात भराऱ्या
  • सीगल पक्ष्यामुळे किनारपट्टीचे सौंदर्य खुलले
  • परदेशी पाहुण्यांनी समुद्र किनारे फुलले
  • सीगल पक्षी अमेरिका, युरोप, लडाखमध्ये दिसतात
  • हजारो किलोमीटरचा प्रवास करून कोकणात दाखल
  • बदलत्या हवामानामुळे हे पक्षी यंदा उशीरा दाखल

In Sindhudurg district Seagull’s flies

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात