पुण्यात जमावाने केला पोलीस पथकावर हल्ला , एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी


पोलीस पथक पकडायला आले आहे हे समजताच शक्तीसिंग बावरी याने तेथील एका समाजातील लोकांना एकत्र करुन पोलिसांविरुद्ध भडकावले.In Pune, a mob attacked a police squad, injuring a police officer and staff


विशेष प्रतिनिधी

पुणे : येरवडा येथील कोते वस्ती येथे सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला.ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान या घटनेत एक पोलीस अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे.दरम्यान येथील नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते.म्हणून येथील नागरिकांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली.त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातील पथक शक्तीसिंगला पकडायला तेथे गेले होते.पोलीस पथक पकडायला आले आहे हे समजताच शक्तीसिंग बावरी याने तेथील एका समाजातील लोकांना एकत्र करुन पोलिसांविरुद्ध भडकावले. दरम्यान हा जमाव पोलिसांवर चाल करुन आला. यामध्ये एक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी पोलिसांनी हवेत एक राऊंड फायर केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी शक्तीसिंग याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान येरवडा पोलीस ठाण्यात शक्तीसिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला.

In Pune, a mob attacked a police squad, injuring a police officer and staff

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण