वृत्तसंस्था
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हा एक शेल बॉम्ब असल्याची माहिती दिली. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही, या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.In Pimpri Chinchwad, a chucky bomb was found while excavating a building; Presumably to be British
खोदकामावेळी आढळला
दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरीमधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू होते. तेव्हा जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळला. उपस्थितांनी सोसायटीच्या चेअरमन यांना ही घटना कळवली. पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ तेथे टीम सोबत पोचले. पुण्याहून आलेल्या बॉम्बनाशक पथकाने तो बाँब सील केला असून तो तपासणीसाठी ते घेऊन गेले आहेत.
यापूर्वीही आढळले ब्रिटिशकालीन बॉम्ब
हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. तो बॉम्ब जिवंत आहे की नाही, या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे. जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेली आहे. यापूर्वी ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात आढळले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीखाली असून ते खोदकामावेळी उघडकीस येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App