एकट्या मुंबईत बलात्काराचे ७ सात महिन्यात ५५० गुन्हे; पण शिवसेनेने भाजपला करून दिली कठुआ आणि हाथरसची आठवण

विशेष प्रतिनिधी

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणावरून पीडितेला न्याय देण्याऐवजी राजकीय घमासान जोरदार सुरू झाले असून शिवसेनेने आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपवर दुगाण्या झोडल्या आहेत. In Mumbai alone, 550 rape cases in 7 months

सामनाच्या अग्रलेखातून भाजपला कठुआ आणि हाथरस या घटनांची आठवण करून दिली आहे. एकट्या मुंबईत गेल्या ७ महिन्यात 550 बलात्कारांची पोलिसांमध्ये नोंद झाली आहे. यापैकी 445 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केल्याची फुशारकी देखील शिवसेनेने मारली आहे. साकीनाका बलात्कारातील आरोपींना तर पोलिसांनी दहा मिनिटात गजाआड केले, मात्र कठुआ आणि हाथरस मध्ये बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनासाठी जमाव बाहेर पडले, असा आरोप शिवसेनेने भाजपवर करून घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.



प्रत्यक्ष मुंबई पोलिसांची आकडेवारी मात्र काही वेगळेच सांगते आहे. बलात्काराच्या 550 घटना, विनयभंगाच्या 750 वर घटना या गेल्या सहा-आठ महिन्यात एकट्या मुंबईत आहेत. या पोलिसांकडे झालेल्या नोंदी आहेत. नोंदणी झाली नसलेली प्रकरणे यापेक्षा कितीतरी अधिक असली पाहिजेत. राज्यात ठाकरे – पवार सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे असेल धिंडवडे उडाले असताना शिवसेनेने मात्र सामनाच्या अग्रलेखातून भाजपला ठोकण्याचा प्रयत्न केला आहे.

In Mumbai alone, 550 rape cases in 7 months

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात