पवित्र पाेर्टल अंर्तगत चालू असलेली उर्वरित शिक्षक भरती लवकर पूर्ण करावी तसेच अभियाेग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ टेट परीक्षेचे एमपीएससी मार्फेत आयाेजन विनाविलंब करण्यात यावे अशी मागणी एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र तर्फे करण्यात आली आहे. In Maharashtra 50 tousand teacher post vaccancy there is need to feeling of post urgent basis demanded MPSC samanvay samiti
विशेष प्रतिनिधी
पुणे : पवित्र पाेर्टल अंर्तगत चालू असलेली उर्वरित शिक्षक भरती लवकर पूर्ण करावी तसेच अभियाेग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ टेट परीक्षेचे एमपीएससी मार्फेत आयाेजन विनाविलंब करण्यात यावे अशी मागणी एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र तर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण आयुक्त सुरज मांढणे यांच्याकडे निवदेन देऊन करण्यात आली आहे.
एमपीएससी समन्वय समितीचे राज्य संघटक सुरेश सावळे म्हणाले, राज्यातील पात्र अभियाेग्यता धारक बेराेजगारांची स्थिती लक्षात घेता तसेच शिीण क्षेत्रातील भ्रष्टाचार पाहता सन २०१७ पासून प्रलंबित असलेली उर्वरित शिक्षक भरती लवकरात लवकर घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दर सहा महिन्यांनी अभियाेग्यता व बुध्दिमत्ता चाचणी घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जीआर काढलेला अाहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी. नियाेजित २०२ ची अभियाेग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (२ टेट) परीक्षेसाठी जाहिरात देऊन तिच्या परीक्षेची तारीख जाहीर करुन ती एमपीएससी मार्फेत घेऱ्यात यावी. राज्यात सुमारे ५० हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहे त्या याच वर्षात पूर्ण भराव्यात.
मागील पाच वर्षापासून तांत्रिक अडचणी दाखवून उर्वरित शिक्षकभरती प्रलंबित ठेवण्यात आली आहे. १९६ शिक्षण संस्थांचे प्रेफरेन्स पवित्र पाेर्टलला तात्काळ सुरु करावे व निवड यादी विनाविलंब घाेषित करावी. बाेगस व टीईटी अपात्र शिक्षकांची सेवा समाप्त करुन त्या जागेवर पवित्र पाेर्टल मधून उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांची निवड करण्यात यावी. पवित्र पाेर्टल मधील तांत्रिक अडचणी दूर करुन ताे पारदर्शक करावा. राज्यात मागील दाेन वर्षापासून काेराेनामुळे काेणत्याच परीक्षा हाेऊ शकल्या नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांचे वय पूर्ण झाले आहे किंवा ज्यांचे संपत आले आहे त्यांना पुढील शिक्षक भरतीत दाेन संधी उपलब्ध करुन द्यावेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App