भाजी आणण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महिलेला भर रस्त्यात गाठून शरिर सुखाची मागणी करत अश्लिल भाषेत संवाद साधणार्या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -भाजी आणण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महिलेला भर रस्त्यात गाठून शरिर सुखाची मागणी करत अश्लिल भाषेत संवाद साधणार्या एकावर हडपसर पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदिप सायबु जाधव (रा. काळेपडळ, हडपसर,पुणे) याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे In Hadapsar area 20 yrs women complaint against molestation
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा महिलेचा काही दिवसांपासून पाठलाग करत होता. एक महिन्यापुर्वी महिला घरातून भाजी आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी त्याने तिला रस्त्यात अडवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. परंतु, महिलेने त्याला नकार दिला. 25 मार्च रोजी महिलेच्या घरी देवीच्या परडीचा कार्यक्रम होता. तेथे आरोपी देखील आला. कार्यक्रम चालून असताना आरोपी तिच्याजवळ आला तिच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करून तिचा विनयभंग केला. याबाबत तिने सासुला आणि आरोपीच्या नातेवाईकाला प्रकार सांगितल्यानंतर त्याला समजावत असतना त्याने त्याच्याच नातेवाईकाला मारहाण केली. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार दिपक जाधव (19, रा.वारजे,पुणे ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते 24 मार्च 2022 दरम्यान घडला. जाधवने मुलीबरोबर प्रेमसंबध निर्माण करून तिला त्याच्या घरी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App