विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत ५०० चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता दहा महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या संदर्भात शिवसेनेच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत त्यांनी निवडणुकीसाठी तयारीला लागा; मी माझ्या कामाने माझी पोचपावती देतो, असे सांगितले. Important meeting between Uddhav Thackeray and Shiv Sena office bearers for BMC Election
शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्यात पक्षप्रमुख यांनी विविध आदेश शिवसैनिकांना दिले. मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार, विभागप्रमुख उपस्थित होते.
येत्या काही महिन्यात राज्यात १० महापालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे महापालिका निवडणूक सोपी राहिलेली नाही. मुंबई महापालिकेत सत्ता कायम टिकवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. दुसरीकडे शिवसेनेला भाजपचे मोठे आव्हान आहे. भाजपाने कोअर कमिटीने शहरात विविध ठिकाणी आंदोलन, कार्यक्रम घेत लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोचवा, असा आदेश दिला आहे. मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता करमाफी निर्णय जनतेपर्यंत पोचवावा. विकास कामाची पोचपावती जनतेला मिळायला हवी, असे त्यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, वैयक्तिक टीकेला मी शांतपणे घेत आहे कारण मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागा. मी वेळीच माझ्या कामाने माझी पोचपावती देतो. जनतेची कामे करा आणि जनतेपर्यंत पोचलंच पाहिजे, असा संकल्प करा असा आदेशही पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आहे.
दरम्यान, या बैठकीत मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोठ-मोठी बॅनर लावू नका. ते जनतेला आवडत नाहीत अशा सूचना केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App