Raj Thackeray : मनसैनिकांसाठी इम्युनिटी डोस सभा!!


मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील बहुचर्चित सभा पार पडली. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मोठे वादळ तयार करून ठेवले होते. त्यामध्ये अनेक पक्षांना आणि प्रमुखांना त्यांच्या सभेची दखल घेत प्रत्युत्तर देणे भाग पडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदींनी त्यांना प्रत्युत्तरे देखील दिली होती. पण या सर्वांना प्रत्युत्तर देण्याची अपेक्षा राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेत ठेवण्यात आली होती. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा ठाण्याची उत्तर सभा संभाजीनगर ची सभा यानंतर पुण्याच्या आजच्या सभेत त्यातुलनेत सौम्य भाषण केले. पण नेमकेपणाने काही मुद्दे मांडत आपण महाराष्ट्र सैनिकांना जपतो हा राजकीय संदेश या सभेतून दिला. Immunity dose meeting for psychiatrists

राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर बूस्टर डोस सभा, मास्टर स्ट्रोक सभा, बाप सभा वगैरे राजकीय टर्मिमिनॉलॉजी महाराष्ट्रात तयार झाली होती. तीच टर्मिनॉलॉजी वापरायची झाली तर आजची राज ठाकरे यांची पुण्यातील सभा मनसैनिकांसाठी इम्युनिटी डोस सभा ठरली आहे. महाराष्ट्र सैनिकांचा जोश आणि मनोधैर्य टिकवण्यासाठी राज ठाकरे यांनी आजची सभा घेतल्याचे यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.

टोल विरोधी आंदोलन, मशिदीवरील भोंगे विरोधी आंदोलन यशस्वी झाले. सर्व सरकारांना मनसेच्या आंदोलनामुळे कारवाई करावी लागली, याकडे राज ठाकरे यांनी आवर्जून लक्ष वेधल्याचे दिसले.

त्याच बरोबर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी आजच्या सभेत मांडला तो म्हणजे आपल्या अयोध्या दौऱ्यावरून अनेकांनी राजकीय ट्रॅप लावला होता. या ट्रॅप मध्ये आपण अडकलो असतो तर आपल्याला मनसे पक्ष म्हणून आणि मनसैनिक म्हणून खूप त्रास झाला असता, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले बॉम्बे आंदोलनावरून तब्बल 28 हजार मनसैनिकांवर महाराष्ट्र सरकारने केसेस टाकल्या. तशाच केसेस अयोध्या दौऱ्यातून आपल्यावर आणि मनोज सैनिकांवर टाकण्याचा अनेकांचा डाव होता आणि तो डाव यशस्वी झाला असता तर ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या मनसैनिकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवले गेले असते, असे राज ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांना थेट उत्तरे देण्याच्या फंदात राज ठाकरे पडले नसले तरी मनसैनिकांना पुरेसा राजकीय मेसेज मात्र देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मनसेची नेमकी राजकीय ताकद राज ठाकरे यांना माहिती असल्यामुळे आहे ती ताकद जपून ठेवणे आणि योग्य वेळी तिचा वापर करणे हाच संदेश त्यांनी पुण्याच्या भाषणातून मनसैनिकांना दिल्याचे दिसते.

– शरद पवारांना टोला

बाकी निवडणूक नाही तर उगाच कशाला पावसात भिजून भाषण करायचे असा टोला त्यांनी शरद पवारांना लगावला. सभेच्या सुरुवातीलाच सभेत उपस्थित असणाऱ्या अंध व्यक्तींना सन्माननीय व्यासपीठावर बोलावले सभेनंतर त्यांच्याशी संवाद साधला यातूनही राज ठाकरे यांना जो संदेश द्यायचा होता तो मनसैनिकांपर्यंत पोहोचला. त्याचवेळी राज ठाकरे यांनी आपण दोन तीन दिवसांत पत्र तयार करणार आहोत ते पत्र महाराष्ट्रात घरोघरी पोहोचवा, असे आवाहन करत राज ठाकरे यांनी आपली सभा संपवली. ही सभा खऱ्या अर्थाने मनोज सैनिकांसाठी इम्युनिटी डोस ठरली.

– पायाची शस्त्रक्रिया एक तारखेला

राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढले आहे. त्यामुळे त्यासंदर्भातली मणक्यावरची शस्त्रक्रिया 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल आणि एक दीड महिन्यांनी पुन्हा जनतेसमोर येऊ, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Immunity dose meeting for psychiatrists

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात