मोदी – चॅम्पियन भेटी : देशाच्या राजकीय घमासानावर मोदींचा सॉफ्ट पॉवर पंच!!


एकीकडे देशात ज्ञानवापी मशिद वाद, राहुल गांधींचा केंब्रिज दौरा, राज ठाकरे यांचा रद्द झालेला अयोध्या दौरा यावरून राजकीय घमासान सुरू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सॉफ्ट पॉवरचे प्रयोग देशात राबवत चालले आहेत. Modi’s soft power punch on the country’s political turmoil

देशातल्या राजकीय घमासानाशी आपले काही देणे घेणे नाही असेच ते अप्रत्यक्षरीत्या दाखवून देत आहेत. पण हे दाखवताना आपली मध्यवर्ती भूमिका मोदी कधीच विसरत नाहीत किंबहुना ते नेमके राजकीय टायमिंग साधून ही मध्यवर्ती भूमिका जनतेच्या मनावर ठसवत राहतात. तसेच काहीसे मोदींनी गेल्या दोन दिवसांत केले आहे.

राहुल गांधी तिकडे केंब्रिजमध्ये बसून देशातल्या असंतुष्ट वातावरणाविषयी हुकुमशाही विषयी वाटेल ते बोलत होते. तर इकडे नरेंद्र मोदी त्याच वेळी मूकबधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून आलेल्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधत होते. राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठातून मोदी सरकारवर तोफा डागण्यासाठी निमित्ताने देशात किती वाईट वातावरण आहे याचे वर्णन करत करताना “द्वेषाचे केरोसीन” वगैरे शब्द प्रयोग करत होते होते, तर मोदी पंतप्रधान मोदी मूकबधिर ऑलिंपिक वीरांशी संवाद साधताना स्वतःला देशातल्या तरुणीशी जोडत होते. सायंकाळी केंद्र सरकारचे महागाई वरचे उतारा प्रयोग करत होते. राजकीय टायमिंग साधून मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात मोठी घट करून जनतेला दिलासा तर दिलाच पण त्याचबरोबर भाजपविरोधी सरकारे असलेल्या राज्यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडले.

हे सुरू असतानाच देशभर राज ठाकरे यांच्या सभेची चर्चा समांतर पातळीवर सुरू होतीच, त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला ब्रजभूषण सिंह यांना ते घाबरले वगैरे चर्चा सोशल मीडियात होत्याच पण याकडे दुर्लक्ष करून मोदींनी आजही आपली चॅम्पियनची भेट सुरू ठेवली. आज ते बॅडमिंटनमध्ये प्रतिष्ठेच्या थॉमस कप विजेत्या भारतीय टीमला भेटले आहेत. एकीकडे ज्ञानवापी मशिदीचा वाद टोक गाठतो आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत विषय पोचला आहे. गुप्तचर खात्याने त्याच्या परिणामांचा इशारा दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर मोदी आपले सर्व लक्ष युवाशक्ती वर केंद्रित करताना सॉफ्ट पॉवर वापरत आहेत हेच यातून स्पष्ट होते. राजकीय कृती तर करायची पण ती “राजकीय” वाटता कामा नये याची पुरेपूर काळजी घ्यायची हे मोदींच्या सॉफ्ट पॉवर वापराचे वैशिष्ट्य आहे. आणि तेच वैशिष्ट्य जपत मोदींनी गेल्या दोन दिवसात आपली राजकीय वाटचाल अधिक ठळक केली आहे.

बिगर भाजपशासित राज्यांमध्ये मतचाचण्यांचा निकाल याच सॉफ्ट पॉवरबाज मोदींच्या बाजूने लागला आहे. दस्तूरखुद्द पश्चिम बंगाल मध्ये देखील मोदींनी पंतप्रधान पदाच्या मतचाचणी ममता बॅनर्जींन वर मात केली आहे. राहुल गांधी, केजरीवाल हे त्यांच्या जवळपासही पोहोचत नाहीत. भारतातली स्पर्धा मोदींनी नंबर 1 साठी तर शिल्लक ठेवली नाहीच, पण 2 नंबर साठीची स्पर्धादेखील मोदींपासून दुपटीपेक्षा जास्त अंतरावर नेऊन ठेवली आहे, हे मोदींच्या सॉफ्ट पॉवरचे यश आहे!!

Modi’s soft power punch on the country’s political turmoil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात