WATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा

Illegal sand extractors 10 boats confiscated in pune Distric

(Illegal sand extractors) पुणे : अवैध वाळू उपसा करणाऱ्या १० बोटी जप्त करून १ कोटी १५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. पाच वाळू माफियांविरोधात पुणे जिल्ह्यातील वाटलुज गावच्या हद्दीत कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि त्यांच्या पथकाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह ही धडक कारवाई केली.. साध्या वेशात जाऊन वाटलुज गावच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या १० बोटींसह १ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. भीमा नदीच्या पात्रात सक्शन बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात होता. वाळू माफियांना दौंड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच वाळू माफियांविरुद्ध दौंड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  Illegal sand extractors 10 boats confiscated in pune District

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण