विशेष प्रतिनिधी
मुंबई : एखाद्या मुलीला आय लव्ह यू म्हणणे हे गुन्हा नाही तर प्रेमाची अभिव्यक्ती असल्याचे न्यायालयानेच म्हटले आहे. मात्र, ते एकदाच. मुलीच्या इच्छेविरुध्द दुसऱ्यांदा आय लव्ह यू म्हटले तर मात्र गुन्हा ठरू शकतो.I love you expression of love but once, the second time the girl says can be a crime
पोक्सो कायद्याशी संबंधित प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश कल्पना पाटील महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोणत्याही मुलीला एकदा आय लव्ह यू बोलणे हा गुन्हा ठरत नाही. याला संबंधित मुलीचा जाणीवपूर्वक केलेला अपमान म्हणता येणार नाही, तर ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे,
असे मत नोंदवत विशेष न्यायालयाने आरोपी 23 वर्षीय तरुणाची पोक्सोच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी हा निकाल दिला आहे. पीडित 17 वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात वडाळा टीटी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपीने तिला आय लव्ह यू म्हणजे माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हटले होते. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने मुलीकडे बघून डोळाही मारला होता तसेच मुलीच्या आईला धमकावले होते, असे विविध आरोप तक्रारीत करण्यात आले होते.
विशेष न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली. मात्र या प्रकरणातील आरोपीने वारंवार मुलीचा पाठलाग केला आणि तिला आय लव्ह यू म्हटले, असे घडलेले नाही. आरोपीने केवळ एकदा आय लव्ह यू म्हटले आहे. एखाद्या मुलीला एकदा आय लव्ह यूह् म्हणणे ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे. याला पीडितेच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेले, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App