फायर फायटर गाडीवर देशी हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम; सांगलीतील रस्ते चकाचक करण्यास सुरुवात


विशेष प्रतिनिधी

सांगली : पुराचा फटका बसलेल्या सांगली शहरातील रस्ते स्वच्छतेच काम सुरु झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने देशी बनावटीची हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम जुन्या फायर फायटर गाडीवर बसविली आहे. पालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कल्पनेतून ही हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम तयार केली आहे. Hydraulic washing system on a firefighter vehicle; Useful For Cleaning Roads

अशा पद्धतीची सिस्टीम असणारी गाडी स्वीडनमध्ये वापरात आहे. आशा स्वीडन टाईप गाडीप्रमाणे तांत्रिक व्यवस्था महापालिकेच्या अग्निशमन गाडीवर बसवण्यात आल्या आहेत. या अग्निशमन गाडीच्या पुढच्या बाजूला हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम बसविली आहे. त्या द्वारे रस्त्यावरील माती, चिखल गाडी पुढे जाताना साफ होणार आहे. महापालिकेचे अभियंता वैभव वाघमारे आणि मनोज वझे यांनी हा देशी जुगाड वापरला आहे. ही गाडी सांगलीतील मुख्य मार्गावर चिखल बाजूला काढून रस्ते स्वच्छ करण्याचे काम करणार आहे , अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी दिली.

  • हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिमद्वारे रस्त्यांची स्वच्छता
  • अभियंता वैभव वाघमारे, मनोज वझे यांनी साकारली
  • फायर फायटर गाडीवर हायड्रोलीक वॉशिंग सिस्टिम
  • रस्त्यावरील चिखल, माती स्वच्छतेसाठी उपयुक्त
  • स्वीडन टाईप गाडीप्रमाणे तांत्रिक व्यवस्था उभारली

Hydraulic washing system on a firefighter vehicle; Useful For Cleaning Roads

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण