विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील वर्षी नववीच्या हजेरी पटावर असलेल्या तब्बल तीन लाख मुलांची यंदा शाळांतून गळती झाली आहे. या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्जच भरले नसल्याचे समोर आले आहे.यामागील खरी कारणे कळाली नसली तरी याचे शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत.Huge drop out in students numbers
कोरोना तसेच स्थलांतर, बालविवाह अशी अनेक कारणे यामागे असल्याचे तज्ञांचे मत आहे. शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थांना उत्तीर्ण करण्यासाठी नववीतील विद्यार्थ्यांचे गुण ग्राह्य धरण्यासाठी त्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.
त्यानूसार मागील वर्षी १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी नववीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नापास जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी १७ नंबरचा अर्ज भरणे अपेक्षित होते. तसेच, त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणे अपेक्षित होते;
मात्र यावर्षी दहावीला परीक्षेसाठी आलेले अर्ज १६ लाख ५७ हजार आहेत. त्यातील साधारण ५६ हजार पुर्नपरिक्षार्थी आहेत. साधारण १६ लाखच नियमित विद्यार्थी आहेत. म्हणजेच जवळपास तीन लाख विद्यार्थी नियमित प्रवाहातून बाहेर पडल्याचे दिसून आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App