कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी


विशेष प्रतिनिधि

बीजिंग – चीनच्या अंतर्गत बाबीत दखल देणे अमेरिकेने बंद करावे असा इशारा चीनच्या परराष्ट्रीय धोरणाचे वरिष्ठ सल्लागार यांग जायची यांनी दिला आहे. कोरोनाच्या साथीच्या उगमाबद्दल अमेरिका राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.China warns USA on corona issue

तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी विषाणूच्या उगमाबद्दल पारदर्शकता राखण्याचे व सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा प्रसार झाला,



अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कोरोनाच्या प्रसाराला कारणीभूत ठरलेल्या ‘सार्स सीओव्ही-२’ या विषाणूच्या उत्पत्तीच्या ठिकाणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत असून ती चीनसाठी अडचणीची ठरत आहे. मात्र या सर्व गोष्टी बिनबुडाच्या असून त्यामुळे चीन चिंतेत आहे, असे यांग म्हणाले.

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने सत्य आणि विज्ञानाचा सन्मान करावा, कोरोनाच्या उत्पत्तीवर राजकारण तापविण्याचा प्रयत्न न करता ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्यावर लक्ष केंद्रीत करावे, असा उपरोधिक सल्ला त्यांनी अमेरिकेला दिला.

जायची व अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी काल दूरध्वनीवरून चर्चा केली. या हाँगकाँगमध्ये स्वातंत्र्यावरील बंधने, शिंजियाग भागात मुस्लिमांना केलेली अटक आदी विषय चर्चेत आले.

China warns USA on corona issue

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात