ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली

ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं आहे. वैजापुरात एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केली. बहिणीला भेटण्याचे निमित्त करून आरोपी भाऊ व आई दोघेही तिला भेटायला गेले. यावेळी भावाने कोयत्याने सपासप वार करून बहिणीचे मुंडके धडावेगळे केले. तिचा पती पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. Honour Killing In Vaijapur Aurangabad Police Arrested Accused Minor Brother And Mother


वृत्तसंस्था

औरंगाबाद : ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं आहे. वैजापुरात एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीची निर्घृण हत्या केली. बहिणीला भेटण्याचे निमित्त करून आरोपी भाऊ व आई दोघेही तिला भेटायला गेले. यावेळी भावाने कोयत्याने सपासप वार करून बहिणीचे मुंडके धडावेगळे केले. तिचा पती पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी मोटे (वय 19) असे मृत विवाहितेचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात लाडगावात ही घटना घडली. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, मृत बहिणीचे व तिच्या पतीची कॉलेजपासून ओळख होती. सहा महिन्यांपूर्वीच दोघांनी आळंदीत प्रेमविवाह केला. यानंतर नुकतीच ती पतीसह लाडगावात राहायला आली. मृत महिलेच्या भावाला ही माहिती मिळाल्यावर तो आईसह बहिणीला भेटण्यासाठी रविवारी लाडगावात गेला.

यावेळी त्याने मोठ्या बहिणीला पाहताच राग अनावर होऊन तिच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार केले. यावेळी तिचे मुंडकेही धडावेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही, तर आरोपी भाऊ व आईनेही हत्येनंतर सेल्फीही काढल्याचे समजते. पत्नीवर वार होताच तिचा पती तेथून पळून गेल्याने त्याचा जीव वाचला. शेजारच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ व आईला ताब्यात घेतले आहे.

Honour Killing In Vaijapur Aurangabad Police Arrested Accused Minor Brother And Mother

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात