कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता उच्च न्यायालयाचे कामकाज दोन ऑगस्टपासून सुरू होणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता पुन्हा उच्च न्यायालयाचे दोन ऑगस्टपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. न्यायालयाच्या सर्व खंडपीठाचे तीन दिवस प्रत्यक्ष, तर एक दिवस ऑनलाईन अशा हायब्रीड पद्धतीने कामकाज होणार आहे.High court opens from 2 Aug

मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेत झालेल्या न्यायालय प्रशासकीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यात तीन दिवस प्रत्यक्ष आणि एक दिवस ऑनलाईन पद्धतीने काम करण्याची सर्व यंत्रणा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे.



जे पक्षकार आणि वकील न्यायालयात येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाईनचा पर्याय आहे. तसेच जर आवश्यकता असेल तरच पक्षकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. याचिका दाखल करण्यासाठी व्हर्च्युअल यंत्रणा उपलब्ध असून ई-मेलवरून दाखल करू शकतात.

केंद्र आणि राज्य सरकार रेल्वे प्रवासाबाबत निर्णय घेणार आहे.रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, बीड, नाशिक आणि पालघर येथील न्यायालयांव्यतिरिक्त अन्य न्यायालयाचे कामकाज पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात आले आहे.

High court opens from 2 Aug

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात