राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा


राज्यातील अनेक भागात पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. Heavy to very heavy rains in the next three-four days in the state


विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यातील अनेक भागात पुढील तीन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याने सोमवारी सहा वाजता टिपलेल्या उपग्रह छायाचित्रानुसार दक्षिण गुजरातबरोबरच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर ढग दाटले आहेत.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवर पुढील तीन-चार दिवस जोरदार वारे वाहतील आणि राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल.

कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पहायला मिळेल. मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवार, मंगळवारी पालघर, ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Heavy to very heavy rains in the next three-four days in the state

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात