विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेअरबाजार उघडण्यापूर्वी एचडीएफसी होम लोन अर्थात एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांच्या विलिनीकरणाची बातमी आली आणि शेअर बाजाराने आज जोरदार उसळी घेतली. शेअर निर्देशांकाने 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले तेलाचे दर आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात आलेली तेजी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन शेअर निर्देशांक 60000 टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. HDFC Merger Share Market Boom: HDFC Bank HDFC Home Loan Merger; 60000 jump of Sensex !!
शेअर बाजार सुरू होताच निर्देशांकाने 59900 अंकाचा टप्पा ओलांडला होता. तर, राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टी 17900 अंकापर्यंत पोहोचला. जागतिक शेअर बाजारात तसेच आशियाई शेअर आंध्रप्रदेश अंकातही तेजी दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सी कडून बाजारात राखीव साठा येणार असल्यानं तेलाचे भाव घसरले आहेत. त्याचाही परिणाम शेअर बाजारावर दिसला आहे.
आज सकाळी शेअर बाजारात शानदार तेजी दिसून आली. 59764 अंकावर निर्देशांकाची झाली. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 59900 अंकाचा टप्पा गाठला. तर, निफ्टीची सुरुवातही चांगली झाल्याचे दिसून आले. सुरुवातीच्या वेळेत निफ्टीने 17900 चा स्तर गाठला. मात्र, काही वेळेनंतर नफा वसुली दिसून आली.
आज बाजार उघडण्यापूर्वी एचडीएफसी होम लोन्स आणि एचडीएफसी बँक विलीन होत असल्याची बातमी आली. HDFC चे 25 शेअर्स असणाऱ्या शेअरधारकांना HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाच्या बातम्यांमुळे त्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. HDFC बँक 2 वर्षातील सर्वात मोठ्या तेजीसह व्यवसाय करत आहे.
एचडीएफसी विलीनीकरणामुळे संबंधित कंपनीला फायदा होईलच. परंतु बँकिंग क्षेत्राचा या निमित्ताने विस्तार झाला आहे तसेच याचा परिणाम होम लोन सारख्या घटकावर होणार असून त्याचे विस्तारीकरण आणि भविष्यात ग्राहकांसाठी स्वस्त होण्यामध्ये देखील परिणाम होणार आहे. एचडीएफसी पूर्ण पब्लिक कंपनी होणार असून एचडीएफसी बँकेचे 41% शेअर्स एचडीएफसी मध्ये रुपांतरीत होतील त्यामुळे पब्लिक कंपनीची भागभांडवल क्षमता वाढेल आणि बाजारात एक मोठी पब्लिक कंपनी करू शकेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App