IMD Weather Forecast : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. आकाशात काळे ढग आहेत. आज आणि उद्या (27-28 सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. Gulab Cyclone impact IMD Weather Forecast Heavy Rain in Maharashtra, Red Alert In 11 districts
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘गुलाब’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. आकाशात काळे ढग आहेत. आज आणि उद्या (27-28 सप्टेंबर) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी सायंकाळी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये बदलले. पाकिस्तानने या चक्रीवादळाला ‘गुलाब’ असे नाव दिले आहे. हे वादळ ओडिशामधील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणममध्ये काल रात्री (26 सप्टेंबर) धडकले. गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात विनाश झाल्याचे सांगितले जाते. या वादळाचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भातही दिसून येत आहे. विदर्भापासून कोकणपर्यंत सर्व ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.
आज (27 सप्टेंबर) महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार ते अतिवृष्टी होईल.
मंगळवारी (28 सप्टेंबर) ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार पावसाबरोबरच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटही ऐकू येईल. जोरदार वारेही वाहतील.
महाराष्ट्राच्या कोकण भागाबद्दल बोलायचे झाले तर ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात 27-28 सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गातही मुसळधार पाऊस पडेल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात चंद्रपूरमध्ये अतिवृष्टी, तर यवतमाळ, गडचिरोली येथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण होते. पण संध्याकाळी जास्त पाऊस पडला नाही. मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. पण मुसळधार पावसाच्या ज्या शक्यता होत्या, त्या शक्यताच राहिल्या. पण आता भारतीय हवामान खात्याने दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Gulab Cyclone impact IMD Weather Forecast Heavy Rain in Maharashtra, Red Alert In 11 districts
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App