GREAT STARKID :अभिमानास्पद! अभिनेता आर. माधवनच्या मुलगा वेदांतने महाराष्ट्रासाठी जिंकली तब्बल ७ पदक ; नेटकरी म्हणाले हेच संस्कार-‘आदर्श वडिल-आदर्श मुलगा’


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर सगळ्याच स्टार किड्सना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने वडिलांना गर्व वाटावा असे काम केले आहे.बेंगळुरु येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. वेदांतच्या या यशावर त्याचे वडील खूश आहेत. सोशल मीडियावरही नेटकरी ट्वीट करत वेदांतचे अभिनंदन करत आहेत. GREAT STARKID: Proud! Actor R. Madhavan’s son Vedanta won 7 medals for Maharashtra; Netkari says this is the rite – ‘ideal father-ideal son’

द ब्रिजने दिलेल्यानुसार, वेदांतने ८०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग, ४×१०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग आणि ४×२०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग रीलेमध्ये कांस्य पदक. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंगमध्ये त्याला रौप्य पदक मिळालं आहे.

आर. माधवने बॉलिवूडशिवाय तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटही केले आहेत. ‘रामजी लंदन वाले’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘तनु वेड्स मनु’, ‘3 ईडियट्स’, ‘साला खड़ूस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधवनच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे.

नेटिझन्स आर्यन खान, शाहरुख खान यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आर माधवन यांच्या मुलानं राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यामुळे सोशल मीडियात त्याचं प्रचंड कौतुक करत आहे.

GREAT STARKID : Proud! Actor R. Madhavan’s son Vedanta won 7 medals for Maharashtra; Netkari says this is the rite – ‘ideal father-ideal son’

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती