प्रतिनिधी
सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते, असे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे, असे ट्विट भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.Governor should withdraw hurtful statement: Udayan Raje Bhosale
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल औरंगाबाद च्या कार्यक्रमात समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असा दावा केला होता त्यावर महाराष्ट्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ”देश गुलाम झाला होता, अन्याय-अत्याचार वाढत होते. त्याविरोधात लढण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी यांनी केला. त्यांना समर्थ रामदासांसारखे गुरू मिळाले, ते सद्गुरू होते. त्यामुळे समर्थ रामदासांशिवाय शिवराय नाही. गुरूचे महत्व सांगताना राज्यपालांनी समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले .सोबतच चाणक्य आणि चंद्रगुप्त मोर्य यांचाही उल्लेख केला. समर्थ रामदास नसते तर शिवराय नसते, चाणक्य नसते तर सम्राट चंद्रगुप्त नसते, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (२८ फेब्रुवारी) पुण्यात आंदोलन केले. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
– नेमके काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
‘आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते… चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे., असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हपटले.
मी शिवराय किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.’ असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.
आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
– समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणा
“मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून समर्थ आणि आजपर्यंत अनेक लोकांनी आपल्या परीने योगदान दिलं आहे. आपण मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करत आहोत. समर्थांच्या साहित्याबद्दल आज दिवसभरात भरपूर चर्चा झाली असेल. यानंतर आपल्याला नक्कीच असं वाटलं असेल की समर्थांचा जो भारत, समर्थांच्या स्वप्नातील समाजाची कल्पना प्रत्यक्षात आणली पाहिजे,” असेही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App