विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद मिटण्याची चिन्हे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपालांचे निमंत्रण


वृत्तसंस्था

पुणे : विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुद्द राज्यपालांनी या मुद्यावर चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. Governor BhagatSinh Koshyari invites Cm Uddhav thackeray And DCM Ajit Pawar for discussion Over Appoint 12 MLC

राज्यात दीड वर्ष १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद सुरु आहे. पण, हा वाद निकाली निघण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्याआमदार नियुक्तीसंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी दोघांना आता चर्चेसाठी बोलावले आहे.



विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चर्चेचं निमंत्रण दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यापालांची भेट घेऊन चर्चा करतील. अशी माहिती खुद्द अजित पवार यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.

स्वातंत्र्यदिनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी १२ आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपालांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सरकारमधील नेते काही म्हणत नाहीत किंवा तसा आग्रह धरत नाही, असं राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री स्वत: राज्यपालांशी चर्चा करणार आहेत.

Governor BhagatSinh Koshyari invites Cm Uddhav thackeray And DCM Ajit Pawar for discussion Over Appoint 12 MLC

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात