सत्ता येते-जाते मात्र, त्यामुळे अस्वस्थ हाेण्याची गरज नाही – शरद पवार


सत्ता येते व जाते त्यामुळे आपण इतके अवस्वस्थ हाेण्याची गरज नाही. निवडून येण्यापूर्वीच ‘मी येणार, मी येणार’ अशा घाेषणा काहींनी दिल्या परंतु तसे घडू शकले नाही त्यामुळे त्यांच्या मनात अस्वस्थता आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे – सत्ता गेल्यानंतर लाेक अस्वस्थ हाेत आहे हा काही नवीन भाग नाही.सगळेच काही माझ्यासारखे नसतात. माझी अनेकदा सत्ता गेली. १९८० साली माझे सरकार बरखास्त केले ही माहिती मला रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी सांगितले. त्याचवेळी मी घरातील सामान आवारले आणि सकाळी सात वाजता दुसऱ्या जागी रहाण्यास गेलाे. सत्ता येते व जाते त्यामुळे आपण इतके अवस्वस्थ हाेण्याची गरज नाही. निवडून येण्यापूर्वीच ‘मी येणार, मी येणार’ अशा घाेषणा काहींनी दिल्या परंतु तसे घडू शकले नाही त्यामुळे त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. आमच्या स्नेहांना यापरिस्थितीतून पुढे काय हाेईल हे लवकरच लक्षात येईल. काेल्हापूरच्या निवडणुक निकालाने भविष्यात काय हाेऊ शकते हे दाखवून दिले असे मत राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेबाबतच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.  Government come and go in power but if any party not in come to the power not need to dipression movement in mind says sharad pawar

राज्यातील वीज टंचाई बाबत पवार म्हणाले, यंदाच्या वर्षी देशातील अनेक राज्यात वीजेचा तुटवडा आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश आदी राज्यात वीज कमतरता जाणवत आहे. उन्हाळयात वीजेची मागणी वाढत असून दिवसेंदिवस वीज मागणीत वाढ हाेत आहे. केंद्र सरकार काय म्हणते, राज्य सरकार काय म्हणते या खाेलात मी जाणार नाही. परंतु सर्वांनी एकत्रित बसून याप्रश्नावर मार्ग काढला पाहिजे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम हाेणार नाही याची ही काळजी घेतली गेली पाहिजे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री याप्रश्नातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या दिवसाच्या वेळेतील बराचवेळ याकामाकरिता देत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारत असून पावसाची लवकर अपेक्षा आहे. त्यामुळे यापरिस्थितीत बदल हाेऊ शकेल.


Sharad Pawar : “सिल्वर ओक”वर दगड – चप्पल फेक – एसटी कर्मचारी – राऊत – “मातोश्री” व्हाया राष्ट्रवादी…!!; हल्ल्याची वळणे आणि “वळसे”!!


पुढे ते म्हणाले, एखाद्या धर्माच्या विचारा संबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. धार्मिक गाेष्टी स्वत:पुरत्या, अंतकारणात, घरात ठेवल्या पाहिजे परंतु आपण त्याचे प्रदर्शन करायला लागलाे आहे.अन्य घटकांच्या संबंधी द्वेष वाढेल अशा गाेष्टी करण्यात येत असून त्याचे दुष्परिणाम समाजात दिसायला लागतात. महाराष्ट्रात अशाप्रकारचे वातावरण कधी नव्हते. अलीकडच्या काळात व्यक्तीगत गाेष्टी हाेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी मी आतापर्यंत सभा घेतल्या, विराेधकांवर तुटून पडलाे.

परंतु रात्री सर्व हवेदावे साेडून आम्ही सर्वांशी एकत्रितरित्या वागत हाेताे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून ही परंपरा अखंडपणे राज्यात कार्यरत हाेती. विधीमंडळात मी नव्हताे त्यावेळी यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस.एम.जाेशी हे विराेधी पक्षाचे नेते, त्यांच्यातील चर्चा टाेकाची असायची परंतु त्यानंतर ते राज्याचे हिताचा एकत्रित बसून चर्चा करत. मात्र, दुर्देवाने यावेळी नाही त्या गाेष्टी पाहवयास मिळत आहे. मुख्यमंत्र्यांवर धाेरणात्मक टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु त्यांचे एकेरी नाव घेऊन वेडेवाकडे बाेलणे याेग्य नाही. मुख्यमंत्री पद ही एक संस्था असून त्याचा मान सर्वांनी ठेवला पाहिजे. एखादा धार्मिक कार्यक्रम तुम्ही तुमच्या घरी करु शकता, परंतु ते माझ्या दारात येऊन करता असे म्हटल्याने कार्यकर्त्यात अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे याला दाेष देता येणार नाही तरी यापध्दतीची भूमिका काही लाेक मांडत आहे. काही दिवसात हे वातावरण खाली जाईल. याप्रकारचा विद्वेष, मतभेद कशाप्रकारे वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करु.

Government come and go in power but if any party not in come to the power not need to dipression movement in mind says sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था