प्रतिनिधी
मुंबई : सरकार अस्थिर असताना देखील घाईघाईत कामे मंजुरीचे जीआर त्यापाठोपाठ त्यासाठी निधी वाटप या मुद्द्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध प्रशासकीय पातळीवर आधीच असंतोष असताना आता खुद्द राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनीच ठाकरे – पवार सरकारला मेमो काढला आहे.Governer Bhagat Singh koshiyari issued notice to Thackeray Pawar government regarding 160 gr and work orders
शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना नोटीस बजावली असून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
२२, २३ आणि २४ जून या दिवशी राज्य शासनाने मोठ्या संख्येने शासन निर्णय, परिपत्रके जारी केली होती. सुमारे १६० पेक्षा जास्त निर्णयांचे जीआर आदेश शासनाने अवघ्या तीन दिवसांत जारी केले होते. सरकार जाण्याच्या भीतीने घाईघाईत हे निर्णय जारी केले असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांकडे २४ जून रोजी तक्रार केली होती. हे सर्व निर्णय संशयास्पदरीत्या घेतले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता.
मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय जारी करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता दरेकर यांनी व्यक्त केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची दाखल घेऊन राज्यपालांनी याबाबत कारणमीमांसा स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासनाने काढलेल्या जीआर मध्ये तब्बल 1170 कोटी रुपयांची कामे आणि त्यातही 319 कोटी रुपयांचे निधी वाटप अशा बातम्या आल्या होत्या सर्वाधिक जीआर सार्वजनिक बांधकाम आणि आणि पुरवठा खात्याचे निघाले होते. राज्यपालांनी या जीआर संदर्भात आता विचारणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App