GOPINATH MUNDE : आज मुंडे असते तर युती कायम राहिली असती…! संजय राऊत


  • महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती राहावी यासाठी गोपीनाथ मुंडे शेवटपर्यंत प्रयत्न करत होते, संजय राऊत यांचा आठवणींना उजाळा
  • भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती.
  • शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. GOPINATH MUNDE: If there was Munde today, the alliance would have remained …! Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबईः भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.

संजय राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. यावेळी राऊत यांनी शरद पवारांवरही कौतुकाचा वर्षाव केला. यशवंतरावानंतर पवार हे महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व असल्याचे ते म्हणाले.



भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचेही कौतुक केले. राऊत म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते. त्यांच्यासारखा एकही नेता भाजपमध्ये नाही.

GOPINATH MUNDE: If there was Munde today, the alliance would have remained …! Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात